तोंडातून जास्त थुंकी का येते?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 14:30

सामान्यपणे लहान मुलांची लाळ गळते. मात्र प्रौढ व्यक्तींनादेखील अशी समस्या असते. झोपेत त्यांची लाळगळती होते. मोठ्या व्यक्तींची लाळ गळत असेल तर अनेकदा ते हसण्यावर घेतलं जातं.

लाळ गळण्याची अनेक कारणं आहेत. यासाठी काही आरोग्याच्या समस्या तर काही सवयीदेखील कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

लहान मुलांमध्ये स्नायूंची कमजोरी, मज्जातंतूशी निगडीत आजार किंवा मेंंदूसंबंधी आजारामुळे ही समस्या उद्भवते.

एखाद्या पदार्थाची अ‌ॅलर्जी झाल्यासही लाळ गळू शकते.

सर्दी, खोकला झाल्यावर अनेक जण तोंडावाटे श्वास घेतात. तोंडाने श्वास घेतल्याने लाळ गळते.

घशातील टॉन्सिल्स वाढले असतील तरीदेखील लाळ गळते.

झोप पूर्ण न होणं, झोपेत बडबडणं अशा झोपेसंबंधी समस्या असल्यास लाळ गळते.

अमली पदार्थांचे सेवन करणं हेदेखील लाळ गळणयास कारणीभूत ठरू शकतं.

शिवाय मोठ्या व्यक्तींमध्ये मानसिक समस्येमुळेदेखील अशी समस्या उद्भवते.

लाळ गळती होत असेल तर पोट स्वच्छ ठेवा, पचनास जड असे पदार्थ खाऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने गुळण्या करा, जेवल्यानंतर कोमट पाण्यात आवळा पावडर घालून प्या, तुळशीची पानं चावा आणि त्यावर थोडं पाणी प्या.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info